डीजीटल इंडिया अंतर्गत मेळाव्याबाबत

0
376

पुणे, दि. २९ (पीसीबी) –  केंद्र सरकारच्या डीजीटल इंडिया या मोहिमे अंतर्गत भारतीय डाक विभाग, पुणे ग्रामीण विभाग यांचे मार्फत राजगुरुनगर, देहू रोड, सासवड आणि दौंड या टपाल कार्यालयामध्ये दिनांक १जुलै २०१९ रोजी सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत आधार नुतनीकरण व दुरुस्ती, सुकन्या समृद्धी खाते, टपाल जीवन विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते, आर. डी. खाते इ. योजना परिसरातील नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मेळावा आयोजित केला आहे व इतर पोस्ट ऑफीसमध्ये सुद्धा सुकन्या समृद्धी खाते, टपाल जीवन विमा, इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते, आर. डी. खाते इ. सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे डाकघर अधिक्षक बी.पी.एरंडे यांनी केले आहे.