चिंचवडमध्ये मोपेड दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

0
392

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – नवी मोपेड दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना थरमॅक्स चौकाजवळील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

किरण भास्कर कानवडे (वय २९, रा. बोल्हाईमळा जाधववाडी, चिखली) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात शनिवार (दि.२९) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.२२ एप्रिल) रात्री अडीचच्या दरम्यान किरण हा त्याच्या ताब्यातील नवी मोपेड दुचाकी ही भरधाव वेगाने चालवून निघाला होता. तो थरमॅक्स चौकाजवळील सार्वजनिक रस्त्यावर पोहचला असता त्याची दुचाकी घसरली आणि अपघात झाला. या घटनेत किरणचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. निगडी पोलिस तपास करत आहेत.