‘जैसी करनी वैसी भरनी’; अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य

0
435

मुंबई,दि.४(पीसीबी) – कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेना आमदार अब्दुल सत्तार नाराज होते. सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावर ‘जैसी करनी वैसी भरनी’, असं सूचक वक्तव्य भापज नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

“भाजपनं कोणत्याही प्रकारची फुस लावल्याचा आरोप चुकीचा आहे. महाविकास आघाडीचं लक्ष केवळ खुर्चीवर आहे. जनादेशाचा अवमान करणाऱ्यांनी सत्तेसाठी कोणतेही निर्णय घेत सरकार स्थापन केलं. त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामे देण्याचे प्रकार होणारच” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

अब्दुल सत्तार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सिल्लोड मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळणार असल्याची त्यांना आशा होती.

दरम्यान,अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही केवळ अफवा आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही. उद्या दुपारी साडेबारा वाजता ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतील अशी माहिती, शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.