भाजपाचा राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेचा डाव फसला

0
648

मुंबई, दि.४ (पीसीबी) – ५१ सदस्य असणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा भाजपाचा प्रयत्न फसला आहे. चार सदस्यही फुटल्यामुळे भाजपाला गडचिरोलीमध्ये मोठा धक्का बसल्याच्या चर्चा आहेत. शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये भाजपाच्या चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने आपल्याच उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.

अध्यक्षपदी अजय कंकडालवार २२ विरुद्ध २९ मतांनी विजयी झाले. तर मनोहर पाटील पोरेटी यांची २२ विरुद्ध २९ मतांनी उपाध्यक्षपदी निवड झाली.

पक्षनिहाय सदस्य

भाजप – २०

काँग्रेस – १५
आदिवासी विद्यार्थी संघ – ०७
राष्ट्रवादी काँग्रेस – ०५
अपक्ष – ०४