“जास्त नाटक करालं तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर”

0
496

मुंबई,दि.९(पीसीबी) – ज्यांनी आज देशभरात मोर्चे काढले त्यांना मी सांगतो. मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होत. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. राज ठाकरे दुपारी तीन वाजता सहभागी झाले. यानंतर राज ठाकरेंनी आझाद मैदानात भाषण केलं. यावेळी त्यांनी हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे आपल्या भाषणातून जाहीर केलं.

यावेळी राज ठाकरे बोलताना म्हणाले, पक्षाचं अधिवेशन झालं आणि त्यात मी जाहीर केलं होतं की देशभरात जे मोर्चे निघाले, खास करुन मुस्लिमांनी जे मोर्चे काढले याचे मला अर्थच कळाले नाही. जे जन्मापासून वर्षांनुवर्षे येथे राहिले त्यांना कोण काढून देणार होतं? तसं कायद्यातच नाही, मग त्यांनी ताकद कुणाला दाखवली? एकतर उजवीकडे राहा किंवा डावीकडे राहा अशी सध्या परिस्थिती आहे. केंद्राने काही वाईट केलं आणि त्यावर टीका केली तर ते भाजपविरोधात आणि केंद्राकडून काही चांगले निर्णय झाले आणि कौतुक केलं तर ते भाजपकडून असं बोलतात. मी जेव्हा भाजपने चांगले निर्णय घेतले तेव्हा त्यांचं कौतुक केलं.एकतर इकडंचं किंवा तिकडचं असं झालं आहे. सीएए फक्त चार ओळीचं आहे. प्रश्न पाकिस्तानच्या परिस्थितीचा आहे. आज पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे.

दरम्यान, आज माझं केंद्र सरकारला हेच सांगणं आहे. जर तुम्ही देशातील आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे कायदे आणणार असेल तर ते चुकीचं आहे. हे कायदे करणार असाल, तर त्याची कठोर अंमलबजावणी करा, असही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.