जागेवर अतिक्रमण करून जातीवाचक अपशब्द; तिघांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

0
306

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) – जागेवर अतिक्रमण करून जातीवाचक अपशब्द वापरले. याप्रकरणी तिघांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तीन ते चार वर्षांपासून 7 जुलै 2022 पर्यंत सुतारवाडी येथे घडला.

कालिदास किसनराव कोकाटे, नारायण बबनराव कोकाटे, शिवाजी पंढरीनाथ कोकाटे (सर्व रा. पाषाण, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सुतारवाडी पाषाण येथे सात गुंठे जागा आहे. त्या जागेवर आरोपींनी अतिक्रमण करून फिर्यादी यांना जमिनीतून हाकलून दिले. तिथे ओकवुड नावाचे फर्निचरचे दुकान भाड्याने देऊन लाखो रुपयांचे भाडे घेतले. आरोपींनी फिर्यादी यांच्या मालकी हक्कास नकार दिला. आम्ही पाषाण गावातील स्थानिक रहिवासी असल्याचे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना धमकी देत जातीवाचक अपशब्द वापरले. फिर्यादी यांना त्यांची जागा देण्यास नकार देऊन त्यावर अतिक्रमण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.