जगताप डेअरी चौकाजवळ अपघातात डॉक्टर तरुणीचा मृत्यू

0
1093

वाकड, दि. २६ (पीसीबी) – खासगी बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवार) सकाळी साडेसातच्या सुमारास वाकड येथे घडली.

ऐश्वर्या गरगट्टे (वय २६, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास ऐश्वर्या या जगताप डेअरी जवळील सावित्रीबाई फुले उद्यानासमोरील सिग्नलवरून यु टर्न घेऊन पिंपळे सौदागरच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी खासगी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ऐश्वर्या गंभीर जखमी झाल्या. आणि त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.