चोरी झालेले तब्बल ११४ मोबाईल आणि सोने चांदिचे दागिने पोलिसांनी मुळ मालकांना केले परत

0
913

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी परिसरातून चोरी झालेले तब्बल १४४ मोबाईल आणि सोने चांदिचे दागिने असा एकूण ११ लाख ६७ हजार १९० रुपयांचा ऐवज आज (सोमवार) पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी त्यांच्या मुळ मालकांना परत केला.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, पिंपरी, चिंचवड, निगडी आणि भोसरी परिसरातून मोबाईल चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले एकूण ९ लाख २७ हजार ७९० रुपये किमतीचे तब्बल १४४ मोबाईल तसेच भोसरी पोलीस ठाणे हद्दीतून घरफोडी प्रकरणातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेले एकूण २ लाख ३९ हजार ४०० रुपयांचे सोने चांदिचे दागिने त्यांच्या मुळ मालकांना पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे अभिनंदन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.