चिखलीत अल्पवयीन तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्तापीत करुन जातीचे कारण पुढे करत लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा

0
632

चिखली, दि. २८ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक करत शरीरसंबंध प्रस्तापीत करुन नंतर जातीचे कारण समोर करुन लग्नासाठी नकार देणाऱ्या एका तरुणाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली आणि लातूर येथे घडली.

याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, अक्षय हनुमंत साकोरे (रा. मोईगाव, ता. खेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध होते. गुरुवार (दि.३१ जानेवारी) रोजी त्याने मुलीला लातुर येथे पळवून नेले. तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून चिखली आणि लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडा अहमदपूर येथे वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर मुलीची जात माहिती झाल्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पिडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, अक्षय विरोधात अपहरण, बलात्कार, पॉस्को आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलिस अधिक तपास करत आहेत.