चिंचवड येथे बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी पळवले पावणेसहा लाखांचे दागिने

0
739

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे एकूण ५ लाख ९४ हजाराचे दागिने चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.२६) दुपार ते रविवारी (दि.२७) दरम्यान सर्व्हे क्र. ११६६/६७, शंकुत विहार फ्लॅट नं. २, लक्ष्मीनगर लिंकरोड चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी प्रभाकर यशवंत दुवेदी (वय ६७) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रभाकर दुवेदी हे चिंचवड येथील लक्ष्मीनगरमधील शंकुत विहार येथे राहतात.  शनिवारी (दि.२६) दुपार ते रविवारी (दि.२७) दरम्यान त्याचे घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलुप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे एकूण ५ लाख ९४ हजाराचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.