चिंचवड येथे बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी पळवले पावनेसहा लाखांचे दागिने

0
419

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्या-चांदिचे एकूण ५ लाख ९४ हजाराचे दागिने चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.२६) दुपार ते रविवारी (दि.२७) दरम्यान सर्व्हे क्र. ११६६/६७, शंकुत विहार फ्लॅट नं. २, लक्ष्मीनगर लिंकरोड चिंचवड येथे घडली.