आयुक्त हर्डीकर यांच्याकडून वाकड परिसराची पाहणी; प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना केल्या सूचना

0
585

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वाकड परिसराचा नुकताच पाहणी दौरा करून विविध प्रश्न आणि कामांची माहिती घेतली. या दौऱ्यात आयुक्त हर्डीकर यांनी वाकड परिसराचा कायापालट करण्यासाठी सोबत असलेल्याअधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या सूचना केल्या.

वाकडमधील वेणूनगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात येत असलेले विरंगुळा केंद्र, लिनिअर गार्डन, परिसररातील रस्ते आणि पदपथांची आयुक्त हर्डीकर यांनी पाहणी केली. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आयुक्तांनी उपस्थित नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या गरजा व इतर मागण्या समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी दत्तमंदिर रोडवरील सर्व अतिक्रमणे व अनधिकृत पथारीवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच पालाश सोसायटीसमोरील रस्त्यामध्ये असणारी विहीर हस्तांतरणासंदर्भात संबंधित जागा मालकांशी चर्चा करून प्रशासनामार्फत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.