चिंचवड येथील बियर शॉपीची टोळक्यांनी तोडफोड करुन गल्ल्यातले पैसे पळवले

0
1090

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – सहा जणांच्या टोळक्यांनी बियर शॉपीची तोडफोड करून गल्ल्यातील रोख रक्कम जबरदस्ती चोरुन नेल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी ( दि.३०)  सायंकाळी चारच्या सुमारास चिंचवड पूर्णानगर येथे घडली.

याप्रकरणी शॉपीचे मालक अभिजित सुरेश काळे (वय २१, रा. कोयनानगर, चिंचवड ) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  त्यानुसार जिलब्या उर्फ आकाश गायकवाड, जिंग्या उर्फ राहुल राठोड, अश्या उर्फ आशिष गोरखा, मिलिंद वाघमारे, सचिन राठोड आणि विक्की राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित काळे यांचे चिंचवड येथील पूर्णानगर परिसरात ‘रविराज बियर शॉपी’ नावाचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास आरोपींनी काळे यांना कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली.  मात्र काळे यांनी याचा विरोध केला. यामुळे आरोपींनी बियर शॉपीची तोडफोड करून गल्ल्यातील दोन हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. तसेच दुकानातील दोन कामगारांना लाकडी दंडक्याने मारहाण करून पसार झाले. चिखली पोलिस तपास करत आहेत.