चिंचवडमध्ये नोकरीच्या आमिषाने तरुणाची ७५ हजारांची फसवणूक

0
412

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघा भावांनी एका तरुणाला ७५ हजारांचा गंडा घातला. ही घटना सप्टेंबर २०१८ ते २५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत चिंचवड येथे घडली.

अनंत राजाराम जाधव (वय ५४, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश मनोहर रंगे, आशिष मनोहर रंगे (दोघे रा. आनंद नगर, सिंहगड रोड) या दोन भावंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१८ ते २५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत रंगे भावंडानी फिर्यादी यांच्या मुलाला नोकरी लावतो असे सांगून त्यांच्याकडून ९० हजार रुपये घेतले. त्यातील १५ हजार रुपये रंगे यांनी परत केले. मात्र, ७५ हजार रुपये अद्यापही दिले नाही आणि नोकरीही दिली नाही. याबाबत रंगे भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.