लोणावळ्यातील इंद्रायणी नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
430

लोणावळा, दि. २७ (पीसीबी) – भांगरवाडीजवळील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी आणि गाळ काढण्याचे काम सुरु असताना एका अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या अंगावर निळ्या रंगाची साडी, हिरव्या रंगाचे स्वेटर, जांभळ्या रंगाचा गळ्यात स्कार्प व काळ्या मण्यांचे मंगळसूत्रर, पायात जोडवी आहेत. मृतदेह पाण्यात खराब झाल्याने वयाचा अंदाज येत नाही. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राधिका मुंडे तपास करत आहे.