चिंचवडमध्ये चाकुचा धाक दाखवून तरुणाला लुटले

0
1011

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – रस्त्याने पायी चाललेल्या एका तरुणाला चाकुचा धाक दाखवून लुटण्यात आले. ही घटना चिंचवड वाल्हेकरवाडी येथील मार्तड मल्हार हॉटेलच्या मागील बाजुस घडली.

याप्रकरणी अमोल अजित विश्वास (वय २३, रा वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल हे चिंचवड वाल्हेकरवाडी येथील मार्तड मल्हार हॉटेलच्या मागील बाजुच्या रस्त्यावरुन पायी चालले होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी अमोल यांना चाकुचा धाक दाखवून धमकावले. तसेच त्याच्याजवळील ९ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल आणि काही रोख रक्कम जबरदस्ती हिसकावून चोरुन नेली. चिंचवड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.