दिघीत घराचे कुलुप तोडून पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

0
435

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे आणि काही रोख रक्कम असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवार (दि.३) सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या दरम्यान दिघीतील गजानन महाराज मंदिराजवळील शिवतिर्थ बिल्डींग फ्लॅट नं. १०४ या घरात घडली.

याप्रकरणी संतोष भिमराव कुलकर्णी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी यांचे घर गुरुवारी सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या दरम्यान कुलुप लावून बंध असताना अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.