चिंचवडचे डॉ. गणेश अंबिके यांची PEACE या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संचालक पदी निवड

0
199

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड मधील मोरया सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. गणेश महादेव अंबिके यांची पॉलिसी अ‍ॅण्ड इकॉनोमिक अलायंस केअरिंग ऑफ अर्थ (POLICY AND ECONOMIC ALLIANCE CARING OF EARTH) PEACE या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या डायरेक्टरपदी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे CEO श्री. चिंग सेंग टि यांनी तसे पत्र दिले. या संस्थेस यूनाइटेड नेशन्स ने विशेष सल्लागार म्हणुन यूनाइटेड नेशन्स च्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने 2022 पासून मान्यता दिलेली आहे.

संस्थेच्या वतीने संपूर्ण जगभरात शाश्वत विकासाची 17 ध्येया वर काम केले जाते. जागतिक पर्यावरणाची काळजी घेणे, पॅरिस हवामान कराराचे द्वारे ठरलेल्या 2021-2030 पर्यंत च्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाची अमलबजावणी पूर्ण करने, मानवी अस्तित्वासाठी सामाजिक, आर्थिक व तांत्रिक विकासाची तत्त्वे स्वीकारून माणूस व निसर्ग यांच्यातील सुसंवाद वाढवणे. ईत्यादी उद्दिष्टांवर जगभरात काम केले जाते.

PEACE या संस्थेवर नोव्हेंबर 2023 ते 2028 या कालावधीतसाठी थायलंड चे 22 वे पंतप्रधान श्री. जनरल चावलित योगचाययुद तर अध्यक्ष म्हणुन श्री. छानसन थायलंड, उपाध्यक्ष तसेच CEO म्हणुन श्री चेंग सेंग टी मलेशिया (सल्लागार यूनाइटेड हेबिटेट) तसेच डायरेक्टर पदी डॉ. श्री गणेश अंबिके (अध्यक्ष- मोरया सामाजिक प्रतिष्ठान) श्री अरमान आरझूमनयन (उप अर्थमंत्री – आर्मेनिया), श्री मिशेल हेंग सिंगापुर ( सल्लागार- आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशन) यांची निवड झाली आहे.

डॉ. गणेश अंबिके हे गेली तेरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विषयांवर काम करत असून तेरा वर्षात 44 देशात विविध परिषदेत व्याख्याते, सहभागी,प्रेजेंटेशन ,संयुक्त अभ्यास, इत्यादी साठी सहभागी झाले आहेत. मोरया सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेस ही युनायटेड नेशन ने वॉटर कॉन्फरन्स(अमेरीका) साठी विशेष मान्यता प्राप्त संस्था म्हणून सहभागी करुन घेतले होते. डॉक्टर गणेश म. अंबिके यांना P.E.A.C.E चे अध्यक्ष श्री चानासन व उपाध्यक्ष व CEO श्री चिंग सेंग टी यांनी निवडीचे पत्र दिले तसेच अभिनंदन केले आहे. भाजप शहर अध्यक्ष शंकर जगताप यांनी डॉ. गणेश अंबिके यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.नामदेव ढाके, लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप क्रीडा व कला अकादमीचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, श्री.संजय मराठे, श्री.कृष्णकांत फडणीस, श्री.प्रदीप सायकर आदी मान्यवर उपस्थित होते.