चाकण येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
607

चाकण, दि. २ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना म्हाळुंगे गावाच्या हद्दीतील तळेगाव-चाकण रस्त्यावरील रेंडर कंपनीसमोर घडली.

संजय लक्ष्मण पाटील (वय ३२, रा. खराबवाडी, चाकण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत गवारी यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१० मार्च) रोजी संजय पाटील हे त्यांची दुचाकी (क्र.एमएच/१९/बीडब्लू/९७७४) वरुन तळेगाव-चाकण रस्त्यावरील रेंडर कंपनीसमोरुन जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये संजय यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी रविवार (दि.३१ मार्च) अज्ञात वाहनचालका विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.