अखेर पुण्यातून मोहन जोशी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

0
563

पुणे, दि. २ (पीसीबी) – पुण्यातील  काँग्रेस उमेदवारीचा  घोळ अखेर संपला असून माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  सोमवारी  रात्री उशिरा जोशी यांच्या नावाची घोषणा केली. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड  इच्छुक होते.  अखेर जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी रात्री  ९ वी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातून पुण्यातून मोहन जोशी तर रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.    जोशी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून गेल्या ३८ वर्ष ते काँग्रेस पक्षामध्ये  काम करत आहेत.

दरम्यान, पुण्याचा उमेदवार  ठरण्याआधीच रविवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराला सुरुवात केली होती. पुण्यात आता मोहन जोशी विरुद्ध गिरीश बापट असा सामना  रंगणार आहे.   काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे.