चाकण येथील नगर अर्बन मल्टी स्टेट बँकेमध्ये खोटे दागीने तारण ठेवून ३५ लाखांचा गंडा; १४ जणांविरोधात गुन्हा

0
438

चाकण, दि. १७ (पीसीबी) – चाकण येथील नगर अर्बन मल्टी स्टेट बँकेमध्ये सोने तारण योजने अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी १४ जणांनी बँकेमध्ये खोटे दागीने तारण ठेवून बँकेकडून एकूण ३५ लाख ८९ हजारांचे कर्ज प्राप्त करुन बँकेची फसवणुक करत गंडा घातला. ही घटना मार्च २०१७ ते मार्च २०१९ दरम्यान घडली.

याप्रकरणी किसन विठ्ठल काथवटे (वय ५५, रा. चिखली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल भगवान बनसोडे, विनायक सुनिल चव्हाण, अनिल प्रेमनाथ मोहीते, अजय सुनील चव्हाण (रा. डावरेवस्ती रासे, ता. खेड) आणि आनंद विश्वनाथ गवळी (रा. आंबेठाण चौक चाकण, ता. खेड) आणि इतर ९ जणांविरोधात असे एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१७ ते मार्च २०१९ या कालावधीत वरील १४ आरोपींनी चाकण येथील नगर अर्बन मल्टी स्टेट बँकेमध्ये सोने तारण योजने अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी खोटे दागीने तारण ठेवून बँकेकडून कर्ज मिळवले आणि एकूण ३५ लाख ८९ हजारांचे कर्ज प्राप्त करुन बँकेची फसवणुक करत गंडा घातला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.