मारहाण करत असल्याच्या कारणावरुन भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस पती विरोधात गुन्हा

0
617

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – पत्नीवर वारंवार संशय घेऊन शिवीगाळ करत मारहाण करत असल्याने एका पोलीस हवालदाराविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडित २७ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तिच्या ३० वर्षीय पोलीस हवालदार पती मनोज सुपेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित २६ वर्षीय महिलेचे मनोज सोबत २०१४ मध्ये विवाह झाला होता. या दरम्यान पती मनोज वारंवार पिडितेवर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करायचा. याप्रकरणी पिडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०१८ मध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अद्याप मनोज याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, अशी माहिती पिडितेने दिली आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.