चाकणमध्ये बिअरची बाटली तोंडावर मारुन तरुणाला जबर मारहाण

0
513

चाकण, दि. ३० (पीसीबी) – “तु आकुर्डी गावचा आहेस का तुझ्याकडे पाहतो”, असे म्हणून एकाने तरुणाच्या तोंडावर बिअरची बाटली मारुन जखमी केले. तसेच हाताने देखील मारहाण केली. ही घटना सोमवार (दि.२९) पहाटे चारच्या सुमारास चाकण मोई येथील तेजस बिरदवडे याच्या घराच्या मागच्या बाजुस घडली.

ज्ञानेश्वर शांताराम मापारी (वय २२, रा. श्रीकृष्णानगर सरस्वती शाळेजवळ, आकुर्डी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दाद्या करपे आणि सौरभ करपे (दोघे. रा. मोई ता. खेड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ज्ञानेश्वर हा मोई येथील तेजस बिरदवडे यांच्या घराच्या मागच्या बाजुस बसला होता. यावेळी आरोपी दाद्या याने “तु आकुर्डी गावचा आहेस का तुझ्याकडे पाहतो”, असे म्हणून त्याच्या तोंडावर बिअरची बाटली मारुन जखमी केले. तसेच सौरभ याने ज्ञानेश्वरला हाताने मारुन जखमी केले. दाद्या आणि सौरभ या दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.