चाकणमध्ये एक देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

0
700

चाकण, दि. १ (पीसीबी) – विक्री करण्यासाठी आणलेली एका देशी बनावटीची पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह एका तरुणाला अटक करण्यात आले. ही कारवाई चाकण पोलिसांनी गुरुवारी (दि.२८) भाम्बोली (ता. खेड) येथे केली.

राम बबन लालगुडे (वय ३०, रा. टाकवे , ता. मावळ जि.पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी चाकण एमआयडीसी येथे एकजण पिस्तुल घेऊन येणार आहे, अशी माहिती चाकण पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयीत आरोपी राम याला ताब्यात घेतले. त्याची अगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी ते जप्त करुन राम याला अटक केली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.