चहा हा शरीराला घातक असतो आणि चहावाला देशाला घातक असतो – अमोल मिटकरी

0
415

बारामती, दि.११ (पीसीबी) – चहा हा शरीराला घातक असतो आणि चहावाला देशाला घातक असतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता केली आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत आले. यावेळी बारामती शहरातून अजित पवार त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा त्यांच्या सत्कार समारंभाच्या भाषणात मिटकरी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांचा नेम चुकला. बारामतीत डिपॉझिट जप्त करू असे फडणवीस म्हणाले होते. मात्र नागपूरमध्ये त्यांना जिल्हा परिषद राखता आली नाही. त्यामुळे उतू नका, मातू नका कारण गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस आहे, असं म्हणत मिटकरी यांनी फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले.