गृहमंत्री अमित शहांकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत सादर

0
345

नवी दिल्ली , दि.९ (पीसीबी) –नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आले.  हे विधेयक मांडण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडांजगी झाली. या गदारोळातूनही मतदान घेऊन विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. 

यावेळी एकूण ३७५ सदस्यांनी मतदान केले. तर विधेयकाच्या बाजूने २९३ सदस्यांनी मतदान केले. तर विधेयकाच्या विरोधात ८२ सदस्यांनी मतदान केले.हे विधेयक अल्पसंख्याकविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. घटनेच्या मूळ तत्त्वाविरोधातच हे विधेयक असल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी केला. मात्र या विधेयकात मुस्लिमांचा उल्लेखच नसल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलं. या विधेयकात धर्माच्या आधारावर सुधारणा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसंच राष्ट्रवादीनेही या विधेयकाला विरोध केला आहे. मात्र राज्यातल्या सत्तेत भागीदारी असलेल्या शिवसेनेनं मात्र पाठिंबा दिला आहे.

दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास झाले तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्माच्या आधारे नागरिकत्व ठरवले जाईल. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या गैर मुस्लिम नागरिकांना यामुळे नागरिकत्व मिळणार आहे. यात फक्त मुस्लिमांना वगळण्यात आले आहे.