कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण:कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाकडून कायम

0
607

मुंबई , दि.९ (पीसीबी) – शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी  कुख्यात गुंड अरुण गवळीला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली आहे. या खून खटल्यात एकूण ११ आरोपी आहेत. या खटल्यात अरुण गवळी आणि इतर आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात सर्व दोषींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होते .न्यायालयाने याचिका फेटाळली असून जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

काय आहे कमलाकर जामसंडेकर प्रकरण?
कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वे याने अरुण गवळीच्या टोळीमधील दोन व्यक्तींना जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यांनी सदाशिव सुर्वेची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने या हत्येसाठी ३० लाखांची सुपारी मागितली होती. सदाशिव सुर्वेने होकार दिल्यावर गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर यांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले होते. यानंतर शूटरच्या मदतीने २ मार्च २००७ रोजी कलमाकर जामसंडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी गोळीबार करत हत्या करण्यात आली.