खासदार बारणेंच्या सर्थकांकडून आमदार जगताप यांच्यावर पातळी सोडून टिका; हा माज येतो कोठून?, मतदारांचा सवाल

0
596

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाल्यास आणि जागा वाटपात मावळ मतदारसंघ शिवसेनेला मिळाल्यास निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी दिली जावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केल्याने शिवसेनेच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर अगदी खालच्या पातळीवरची टिका सुरू झाली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे समर्थक एक पाऊल पुढे जात मावळ मतदारसंघात शिवसेनेला भाजपची गरजच नसल्यासारखी प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. खासदार बारणे यांच्या एका भाच्याने टिकेची पातळी सोडून “जगतापला भांडी घासावी लागणार आप्पाची” अशा शब्दांत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही इतकी मस्ती व माज या लोकांत येतो कोठून? असा सवाल मतदारांना पडला आहे. राजकीय पदाची मस्ती फार काळ टिकणारी नाही. लोकशाही व्यवस्था अशी मस्ती आलेल्यांना हमखास घरी बसवते हा इतिहास आहे, ही बाब सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे.