खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावतीने ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून पोलीस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुरक्षा किट्सचे वाटप

0
508

जुन्नर,दि.८(पीसीबी) – कोरोना विरुद्धच्या लढाईत जनतेच्या रक्षणासाठी ढाल म्हणून काम करणाऱ्या पोलीस व आरोग्य विभागाच्या कोविड योद्ध्यांना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावतीने ‘जगदंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून वैद्यकीय सुरक्षा किट्सचे वाटप करण्यात आले.

जुन्नर तालुका आरोग्य विभागांतर्गत असलेला विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधांमुळे असुरक्षित परिस्थितीत काम करावे लागत आहे. हीच परिस्थिती ठिकठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यावर उभे राहून जनतेचं संरक्षण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची आहे. या सर्व बाबींचा विचार करून डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात वैद्यकीय सुरक्षा किट्स उपलब्ध करून दिली आहेत. त्यानुसार जुन्नर तालुक्यातील आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांना या वैद्यकीय सुरक्षा किट्सचे वाटप आज करण्यात आले.

या प्रसंगी जुन्नरचे गटविकास अधिकारी विकास दांगट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, पोलीस उपअधीक्षक दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, खासदार डॉ. कोल्हे यांचे प्रतिनिधी श्री. सागर कोल्हे, पांडुरंग पवार, पापा खोत, आरतीताई ढोबळे, उज्ज्वलाताई शेवाळे, नगरसेवक भाऊ कुंभार, फिरोज पठाण, आक्षय मांडवे,जितेंद्र चौधरी, विजय कोल्हे, सचिन गिरी , आशिष हांडे , तेजस झोडगे, तुषार डोके आदी उपस्थित होते.