आठवड्यात सार्वजनिक वाहतुकीबाबत महत्वाचा निर्णय

0
388

नागपूर, दि. ८ (पीसीबी) : सार्वजनिक वाहतुकीबाबत एक महत्वाचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार असल्याचं गडकरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता घोषित केलेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गडकरी म्हणाले की, आता सार्वजनिक प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होईल. दुकानं देखील हळूहळू सुरु होत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यासाठी काही गाईडलाईन बनवण्यावर विचार सुरु आहे. आमचा विभाग या गाईडलाईन्सचं पालन करेन.

राज्यांसोबत केंद्राच्या समन्वयाबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, राजकारण आपल्या जागी आणि आता आलेलं हे संकट आपल्या जागी आहे. हे संकट गंभीर आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यानंतर भारताला महासत्ता बनवण्यासाठी कुठलेही राजकीय मतभेद नाहीत. आम्ही कुणीच सध्या राजकीय मतं व्यक्त करत नाहीत. मी महाराष्ट्रात आहे. दर दोन तीन दिवसांनी मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी बोलतो. माझ्या काही सूचना असतात त्या दोतो. पंतप्रधान मोदी देखील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद करत आहेत, असं गडकरी यांनी सांगितलं.