खासदार उद्यनराजेंची ‘ती’ इच्छाही पूर्ण होईल – चंद्रकांत पाटील   

0
634

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची इच्छा आहे. ती पूर्ण होईल. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाने भाजप-शिवसेना युतीला फायदा होण्याच्यादृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

यावेळी पाटील म्हणाले की, लोकांच्या मनात भाजपबाबत विश्वास असल्याने आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघाचा विकास होण्याची खात्री असल्याने पक्षप्रवेश होत आहेत.  एक सप्टेंबरला काही पक्षप्रवेश होणार आहेत. पक्षप्रवेशाची मोठी रांग आहे. मात्र, संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत का, हे पाहिले जाते. तसेच, प्रवेश करणाऱ्यांना कोणतेही आश्वासन देण्यात येत नाही.

पाटील पुढे म्हणाले की उद्यनराजे राजे असल्याने त्यांची  पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची  इच्छा असल्यास ती अवश्य पूर्ण होईल.  राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेबरोबर युती करण्यात अडचण निर्माण होऊ शकते का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘राणेंच्या पक्षप्रवेशाने युतीला फायदा होईल, त्यादृष्टीने शहा आणि फडणवीस हे निर्णय घेतील.