खडसे काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू – बाळासाहेब थोरात

0
325

मुंबई,दि.९(पीसीबी) – एखादा सामान्य कार्यकर्ता कष्ट करतो. मेहनत घेतो. सर्व सामान्य कार्यकर्ता ते नेता हा प्रवास सोपा नसतो. एकनाथ खडसेंनीही खूप मेहनत घेतली आहे. मात्र तरीही पक्षात दर अशी वागणूक मिळत असेल तर ते योग्य नाही. खडसे काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवासांपासून पक्षावर नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी वारंवार व्यक्त केली आहे. त्यानंतर खडसे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर थोरात यांचं हे विधान महत्वाचं आहे.

मागच्या काही दिवसांत खडसेंनी भाजपच्या नाराज नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यासोबत विचार विनिमय केला. विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर भाजपचा नाराज गट वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.