खडसेंच्या ईडी चौकशीवर पंकजा मुंडेंचं भाष्य; “चूक असेल तर त्याचा न्याय होईल आणि बरोबर असेल तर……’

0
269

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत असून त्यांना पुन्हा एकदा ईडीने बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाली अकि, ‘खडसेंच्या चौकशीवर मीडियातून भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी काही एक्सपर्ट नाही.’

एवढंच नाही तर त्या पुढे असंही म्हणाल्या, ‘एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू होत असून हा राजकीय डाव असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. खडसे यांनीही या कारवाई मागे राजकीय सुडाचा वास येत असल्याचं म्हटलं आहे. पण मला वाटतं ईडी, सीबीआय, सीआयडी या मोठ्या संस्था आहेत. त्यात आपण कमी बोलू तेवढं योग्य आणि न्याय होईल. चूक असेल तर त्याचा न्याय होईल. बरोबर असेल तर त्याचाही न्याय होईल. त्याला आपण कुठे डिस्टर्ब करू नये. खडसेंच्या चौकशीवर मीडियातून भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी काही एक्सपर्ट नाही, असं पंकजा म्हणाल्या.