खंडोबामाळ चौकात रिक्षाची वाट पाहत असलेल्या दोघा भावांना चोरट्यांनी लुटले

0
792

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – पहाटेच्या सुमारास रिक्षाची वाट पाहत बसलेल्या दोघा भावंडांना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना गुरुवार (दि. ७) पहाटेच्या सुमारास आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकातील रिक्षा स्टॅन्डवर घडली.

याप्रकरणी हिम्मतसिंग गजेसिंग गिरासे (वय २३, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हे आकुर्डी येथील खंडोबामाळ चौकात रिक्षा स्टॅन्डवर रिक्षाची वाट पहात थांबले होते. त्यावेळी नंबंर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी फिर्यादीला त्यांचा मोबाईल फोन मागितला. यावेळी फिर्यादी यांनी देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि कोयत्याचा धाक दाखवून दोघांकडील ११ हजार रुपयांचे किमतीचे दोन मोबाईल फोन हिसकावू नेले. निगडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.