क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन भोसरीतील वृध्द महिलेला ५४ हजारांचा गंडा

0
570

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन अज्ञात इसमाने भोसरी एमआयडीसी येथे राहणाऱ्या एका वृध्द महिलेला तब्बल ५४ हजारांचा गंडा घातल आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी येथे ऑनलाईन माध्यमाव्दारे ऑगस्ट २०१८ मध्ये घडली.

सेरेना जेरी डिसुझा (वय ५९, रा. एमआयडीसी भोसरी) असे फसवणूक झालेल्या वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्या डिसुझा यांच्या मोबाईलवर रिवॉर्ड पॉईंट मिळाल्याचा एक लिंक मेसेज अज्ञात क्रमांकावरुन आला होता. या लिंकवर डिसुझा यांनी केल्यानंतर तातडीने त्यांच्या बँक खात्यातून एकूण ५३ हजार ९५५ रुपये अज्ञाताने काढून घेतले. याप्रकरणी डिसुझा यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.