वाकडमधून साडेदहा हजार रुपये किमतीची गावठी दारु जप्त

0
652

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – थेरगाव येथील जगतापनगर झोपडपट्टीमधील एका घरातून साडेदहा हजार रुपये किमतीची एकूण २१० लिटर गावठी दारुचे कॅन जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी आरोपी महिला फरार असून वाकड पोलिस तिचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील जगतापनगर झोपडपट्टीमधील एका घरात अवैधरित्या गावठी दारु विक्री सुरु असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. यावर पोलीसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी बेला अशोक टिडेकरी (रा. भाटनगर, पिंपरी) हि महिला आढळून आली. पोलिसांना पाहताच महिलेने दारुचे कॅन त्या ठिकाणी सोडून पळ काढला. वाकड पोलिस तिचा शोध घेत आहेत.