कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी ‘या’ तिघांची नांवे चर्चेत

0
799

कोल्हापूर, दि. ५ (पीसीबी) –  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवा जिल्हाध्यक्ष कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे.  आमदार सतेज पाटील व माजी खासदार जयवंतराव आवळे यांची नांवे  समोर आली आहेत. तर  ऐनवेळी या दोघांऐवजी माजी प्रदेश सरचिटणीस अॅड. सुरेश कुराडे यांचीही यापदावर  वर्णी  लागण्याची शक्यता आहे.

राज्यात आणि केंद्रात  भाजपचे सरकार आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसमधून  मोठ्या प्रमाणात नेते बाहेर पडत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे तरूण नेतृत्त्व  म्हणून आमदार सतेज पाटील यांचे नांव आघाडीवर आहे. तर  माजी खासदार जयवंतराव आवळे आणि सुरेश कुऱ्हाडे  यांचीही नांवे चर्चेत आली आहेत.

दरम्यान, प्रकाश आवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा निवडणूक  काँग्रेस पक्षावर लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  त्यामुळे ते आता भाजप किंवा शिवसेनेत जाणार की अपक्ष निवडणूक लढवणार?  याकडे जिल्हयाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले  आहे.