कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास स्पष्टपणे बाळासाहेब थोरातांचा नकार

0
298

कोल्हापूर, दि.९ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र थोरातांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

मी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेणार नाही असे आधीच स्पष्ट केले होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसमधील इतर मंत्र्यांना संधी देणे महत्वाचे वाटत. मात्र उद्धव ठाकरेंनी माझे नाव जाहीर केल्याने मलाही आश्चर्य वाटत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.