राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट

0
499

मुंबई, दि.९ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. छठपूजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या रांची दिवाणी न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. मुंबईचे स्थानिक निवासी अंखुरी अंजनी कुमार यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर न्यायालयाने वॉरंट बजावले आहे.

रांची दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश फहीम किरामनी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने राज ठाकरे यांना १८  फेब्रुवारी २०२० रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.