‘कोरोना व्हायरस’ हा केमिकल हल्ला – अनिल देशमुख

0
515

पुणे,दि.१६(पीसीबी) – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘कोरोना व्हायरस’ हा एक प्रकारचा केमिकल हल्ला आहे, असा दावा केला आहे. कोरोनाच्या माध्यमातून नवीन केमिकल शस्त्र पुढे आल्याचं अजब वक्तव्यही त्यांनी केलं.

पुण्यात साहित्य कलाप्रसारणी सभेच्या वतीने मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुखांनी हा दावा केला. या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे अद्याप समजलेलं नाही.

नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन सध्या हल्ले करण्यात येत आहेत. २०१८ मध्ये ड्रोनच्या माध्यमातून व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांवर हल्ला करण्यात आला होता. सध्या केमिकल हल्ले, बायोलॉजिकल हल्ले होत आहेत. त्यातच कोरोनाच्या माध्यमातून नवीन केमिकल शस्त्र पुढे आल्याचं मत अनिल देशमुखांनी व्यक्त केलं.

दरम्यान, सध्या जगापुढे मोठं संकट बनून उभा असलेला ‘कोरोना व्हायरस’ हा एक प्रकारचा केमिकल हल्ला असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.