‘या’ आठ राज्यांना धोक्याचा इशारा …

0
210

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) : ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील मुंबई आणि दिल्ली या दोन महानगरांमध्ये एकाच दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. तर, देशातील आठ राज्यांमधील रुग्ण संख्याही वाढत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी या आठ राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.

 

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13 हजार 154 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 268 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील ओमायक्रॉन संक्रमितांची एकूण संख्या 961 वर पोहोचली आहे. यामध्ये 263 रुग्णांसह दिल्ली पहिल्या तर 252 रुग्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.

राजधानी दिल्लीतही परिस्थिती गंभीर बनली आहे. येथे संसर्ग दर 1.29 टक्के नोंदवला गेला आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटने पंजाब राज्यालाही दणका दिला आहे. गुजरात 97 प्रकरणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय राजस्थान (69), तेलंगणा (62), तामिळनाडू (45) प्रकरणे आहेत.

या वाढत्या रुग्णसंख्येबद्दल केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड या आठ राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या राज्यात कोरोना चाचणी वाढवावी आणि रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करावी. लसीकरण आणि त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी असा सल्ला दिला आहे.