कोरोनायोद्धाच नाही सुरक्षित; कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १४ हजाराच्या उंबरठ्यावर

0
264

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – करोना विषाणू संसर्ग वाऱ्या पेक्षा दुप्पट वेगाने परसतोय. भारतातील करोनाबाधितांची संख्या आता ३३ लाखांचा उंबरठा पार करून गेलीये. आपल्या देशातील सामान्य नागरिकांपासून ते करोना योद्धे समजले जाणाऱ्या पोलिसांनाही दिवसेंदिवस करोना आपल्या जाळ्यात घेत आहे.मागच्या २४ तासांमध्ये राज्यभरात ३४६ पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले असून, दोन पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता जवळ्जवळ १४ हजार ६४१ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ७४१ जण, तर करोनामुक्त झालेले ११ हजार ७५२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १४८ जणांचा समावेश आहे.असं वृत्त एएनआयने वाहिनीने दिले आहे.

करोनामुक्त झालेल्या ११ हजार ७५२ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार १८७ व १० हजार ५६५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १४८ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १३३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील १४ हजार ६४१ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ५५५ अधिकारी व १३ हजार ८६ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ७४१ पोलिसांमध्ये ३५३ अधिकारी व २ हजार ३८८ कर्मचारी आहेत.