कोथरुडच्या वेदभवनला राज्यपालांची २० लाखांची देणगी

0
257

पुणे, दि. २३ (पीसीबी) – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुण्यातील कोथरुड येथील वेद भवन या फक्त ब्राह्मण पुरुषांना वेद शिकविणाऱ्या संस्थेला २० लाखांची देणगी जाहीर केली आहे. वेद भवन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यपालपदावरील घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे एखाद्या धार्मिक संस्थेला देणगी देण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे सांगण्यात आले. दरम्यान, राज्यपालांच्या या कृतीवर आता भाजप विरोधाक आहपाखड करण्याची दाट शक्यता आहे. राज्यपालांना राज्य सरकारच्या बजेटमधून निधी दिला जातो. तो कसा खर्चा करावा हा त्यांचा अधिकार आहे. आमदाराला खुष करण्यासाठी कट्टर जातीय आणि ब्राह्मणी वर्चस्वाचे प्रतिमान मानल्या गेलेल्या वेदभवनाला देणगी देऊन राज्यपालांनी संकेतभंग केल्याचा आरोप सुरू आहे. राज्यपाल हे स्वतः संघ स्वयंसेवक असल्याने त्यांच्याकडून हिंदुत्ववादी संस्था, संघटनांबाबत विशेष सहानुभूती दर्शविली जाते, असाही आक्षेप घेण्यात आला आहे.

राज्यपालांनी आतापर्यंत विविध मुद्यांवर भाजपाच्या बाजुने आपले वजन वापरल्याने ते वादग्रस्त ठरले आहेत. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा धक्कादायक होता. पुढे मंदिरे सुरु करण्यावरुन भाजपाने आंदोलन सुरू केले आणि दुसरीकडे राज्यपालांनीही त्यात वक्तव्य केल्याने ते टीकेचे लक्ष झाले. विधान परिषदेवर नियुक्त करावयच्या १२ आमदारांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन मंत्रीमंडळाने ज्या नावांची शिफारस केली त्याबाबतही राज्यपालांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यातच आता वेदपाठशाळेला २० लाख रुपये देणगी दिल्याचे प्रकरण पुढे आल्याने नवीन वाद निर्माण होणार आहे.