कोण अमित शहा?; दिवाकर रावतेंचा खोचक टोला

0
1037

सातारा, दि. ७ (पीसीबी) – कोण अमित शहा ?, भाजपचे अध्यक्ष अमित शहा का ? असा प्रतिप्रश्न करून शिवसेनेचे नेते व राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शहांना बेदखल करण्याचा प्रयत्न केला. कऱ्हाडच्या दौऱ्यावर असलेल्या  रावते यांनी अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून बेदखल करण्याचा प्रयत्न केला.       

रावते आज (सोमवार)  कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  लातूर येथील कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी युतीच्या कन्फ्युजनमध्ये राहू नका. शिवसेनेसोबत युती झाली तर ठीक नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे, असे शहांनी म्हटले होते.

यावर मंत्री दिवाकर रावते यांना छेडले असता, त्यांनी कोण अमित शहा, असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. त्यांना पुन्हा पत्रकारांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा असे सांगितले. त्यावर मंत्री रावते यांनी ते भाजपचे अध्यक्ष आहेत का? असा पुन्हा प्रतिप्रश्न  करून अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.