केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराचे १५ हजार कोटी रुपये थकवले आहेत – सुप्रिया सुळे

0
433

मुंबई,दि.१७(पीसीबी) – गेल्या ५ वर्षात अव्वल स्थानी असणरी राज्ये खूप मागे गेलेत, त्यातच केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराचे १५ हजार कोटी रुपये थकवले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी-काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला आहे. केंद्र सरकरामुळेच राज्यात अर्थिक अडचणी निर्माण झाल्यात, असंही त्या म्हणाल्या आहेत .

विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. अर्थसंकल्प तयार करणंही अवघड झालं आहे. विविध योजनांवर त्याचा परिणाम होणार असल्याचा इशाराही सुप्रिया सुळेंनी दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलंय. अर्थमंत्री अजित पवार यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या आहेत. केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा कराचे 15 हजार कोटी रुपयांचं घेणं आहे. पैसे नसल्याने कुपोषण, शिक्षण आणि विविध कामांसाठी पैसे येणार कुठून? अर्थसंकल्प तयार कसा करायचा?, असा सवाल अजित पवारांपुढे असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.