केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट..

0
353

पुणे , दि. २३ (पीसीबी) : भाजप नेते तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे . अनेक दिवसांपासून त्यांच्यावर त्याठिकाणी उपचार सुरु आहेत .

काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती तसेच परदेशातून इंजेक्शन आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता, त्याचबरोबर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी देखील भेट घेऊन तब्यतीची विचारपूस केली होती .
आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे . यावेळी दानवेंनी जगताप यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली….
आमदार जगताप यांच्या तब्बेतीत आता सुधारणा होत असल्याचं त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी सांगितलं आहे ..