कुंभमेळ्यातून परतलेल्या ६१ भाविकांपैकी ६० भाविक कोरोनाग्रस्त

0
233

विदिशा, दि.३० (पीसीबी) : हरिद्वार येथील कुंभ मेळ्यातून परतणाऱ्या भाविकांमुळे ठीक ठिकाणी कोरोनाचे स्फोट सुरू झाले आहे. मध्य प्रदेशातील विदिशामधील कुंभातून परत आलेल्या ८३ भाविकांपैकी ६० भाविकांची कोरोना-पॉझिटिव्ह व १ भाविक निगेटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर उर्वरित २२ भाविकांचा तपास न लागल्याने त्यांच्या बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. हे संपूर्ण प्रकरण मध्य प्रदेशातील विदिशा जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गरसपूरचे येथील आहे. विदिशा जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ११ ते १५ एप्रिल दरम्यान भाविक तीन वेगवेगळ्या बसमध्ये हरिद्वारला गेले होते. आरोग्य अधिकाऱ्याच्या मते २५ एप्रिल रोजी यात्रेकरू गरसपूरला परत आले. यानंतर कुंभात गेलेल्या सर्व लोकांना शोधून काढले जात आहे. हरिद्वारला गेलेल्या
एकूण ८३ भाविकांपैकी केवळ ६१ जणांची ओळख पटली आहे, उर्वरित २२ जणांची ओळख पटली नाही आणि आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. आढळलेल्या ६१ पैकी ६० कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणी झालेल्या ६० पैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, उर्वरित ५५ संसर्गग्रस्तांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कुभ मेळ्यातून परतलेल्या भाविकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे कारण अशी भीती आहे की जर त्यांना वेळेत वेगळे केले नाही तर ते सुपर स्प्रेडर ठरतील. हरिद्वार येथील कुंभातच अनेकांना कोरोनाची लागण झाली. यावेळी अनेक संतांचेही मृत्यू झाले. असा विश्वास होता की भक्त कुंभातून आपल्या घरी परतत असताना, कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढेल. अशा परिस्थितीत प्रत्येक राज्य सरकार सतर्क झाले आहे आणि हरिद्वारहून येणाऱ्यांची चाचणी घेतली जात आहे.