किरीट सोमय्या यांची झाली तत पप…

0
314

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनातून भाजपविरोधात एल्गार पुकारला. राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत राज्यातला विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या राज्यातील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांनी सर्वात आधी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पीएमसी घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले. इतकंच नाही तर सोमय्या यांचे राकेश वाधवानशी थेट संबंध असल्याचा आरोप सोमय्या राऊत यांनी केला. या प्रकऱणावर सोमय्या यांनी पत्रकारांनी छेडले असता त्यांची अक्षरशः तत… पप… झाली.

राकेश वाधवान हा पीएमसी घोटाळ्यातील एक आरोपी आहे. तो एक मोठा बिल्डर होता. बरंच काय काय सांगतात. आमचे सगळ्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत अंस सोमय्या म्हणतात. पण मुळात राकेशच्या अकाऊंटमधून भाजपच्या खात्यावर 20 कोटी गेले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

ईडी वाले सुनो.. सीबीआयवाले सुनो.. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे तो एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केला आहे. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारचो की निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची, नील सोमय्याची आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि त्याला लुबाडलं आणि आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. तब्बल 100 कोटी घेतले. लडानीच्या नावावर त्यांनी जमीन घेतली. 400 कोटी रुपयांची जमीन फक्त 4.4 कोटी रुपयांनी खरेदी केली. त्यांनी अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या.. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सौमय्या आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, राऊत यांनी काल आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांना आज पत्रकारांनी सोमय्या यांना विचारले की, पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे की नाही? पत्रकारांच्या या प्रश्नावर सोमय्यांचं आज पुन्हा तत पप झालं. त्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला. यावेळी सोमय्या यांनी ही गोष्ट सावरुन नेत पीएमसी बाँकेतील घोटाळ्याशी आमचा दमडीचा संबंध नाही असं सांगितलं. सोमय्या म्हणाले की, आम्ही त्या बँकेतून एक पैसासुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलतायत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल. राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हे मी पुन्हा एकदा सांगतो. उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. डीएचएफल घोटाळा पण आम्हीच बाहेर काढला. तरीही तर संजय राऊत यांच्याकडे याच्याशी सबंधित डॉक्यूमेंट होते किंवा आहेत तर त्यांना ईडीने इतक्या वेळा बोलवलंय तेव्हा द्यायला हवे होते, ते आताही देऊ शकतात