किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या महिलेची पर्स पळवली

0
265

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) – किराणा समान आणण्यासाठी बाहेर गेलेल्या महिलेची पर्स दोन ओळखीच्या मुलांनी चोरून नेली. ही घटना 21 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाएक वाजताच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत 27 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मायावती रामराव भराडे (वय 26, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश उर्फ गणेश श्रीगोंड (रा. घरकुल, चिखली), गणेश उर्फ परशा (पूर्ण नाव माहिती नाही, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भराडे 21 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास किराणा सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. त्या संभाजीनगर येथील गिरिधारी चौकात आल्या असता त्यांच्या ओळखीची दोन मुले आली आणि त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. पर्मध्ये 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि 20 हजार रुपये किमतीची सोन्याची कानातील फुले होती. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि पर्स असा एकूण 40 हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर फिर्यादी घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दिली नाही. 27 ऑगस्ट रोजी नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.