किरकोळ कारणावरून 16 वर्षीय मुलाला मारहाण; नातेवाईक तरुणाला अटक

0
408

खेड, दि. ८ (पीसीबी) – दुचाकीवरून जात असलेल्या 16 वर्षीय मुलाला बोलावून घेत किरकोळ कारणावरून मारहाण केली. तसेच तलवार घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आला. याप्रकरणी 22 वर्षीय नातेवाईक तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी खेड तालुक्यातील वाकी तर्फे वाडा येथे घडली.

सौरभ मनोहर तळवे (वय 22, रा. वाकी तर्फे वाडा, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी राज सुनील भवार (वय 16) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज हे त्यांच्या नातेवाईकांच्या मोपेड दुचाकीवरून वाकी तर्फे वाडा गावातून जात होते. रस्त्यात थांबलेल्या आरोपी सौरभ याने फिर्यादी याना आवाज देऊन थांबवले. ‘तुझी मम्मी माझ्या मम्मीला मी तुझ्या भावाला तलवार दाखवली’ असे का म्हणाली’ असे आरोपीने राज यांना विचारले. त्यावर आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हणत राज तिथून निघाले. त्यानंतर सौरभ याने राज यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. ‘तुला आज खल्लासच करतो अशी धमकी देखील सौरभ याने राज यांना दिली. गावातील लोक जमा झाल्याने सौरभ याने मारहाण करणे थांबवले. राज त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले असता आरोपी तिथे आला. त्याने तलवार घेऊन राज यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राज यांच्या नातेवाईकाने आरोपीला अडवले आणि त्याच्या हातातील तलवार काढून घेतली. पोलिसांनी सौरभ याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पंचमुख तपास करीत आहेत.